चंद्रपूरजवळ वाघाच्या हल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचे मृत्यू झाला आहे. पेंढरू गावामध्ये झालेल्या या दुर्घटनेत सखूबाई कस्तुरे (५५) यांचा मृत्यू झाला आहे.

सखुबाई शुक्रवारी आपल्या शेतात शेतीचे कामे करायला गेल्या होत्या. रात्री परत न आल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह शेताजवळच आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी वाघाच्या पंज्याचं ठसे आढळून आले होते. वाघाकडून होतअसलेल्या हल्ल्यांमुळे गावकरी व शेतकरी हैराण झाले असून या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ते करीत आहेत.