
लालबाग येथील बाळगोपाळ मंडळ पूर्व विभाग गणेश गल्ली यांच्या वतीने 10 ते 13 मार्चदरम्यान गणेशगल्ली खाद्योत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणेशगल्ली मैदान, लालबाग येथे सायंकाळी 4 ते रात्री 11 या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात खवय्यांना महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. तसेच लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉल उपलब्ध आहेत. बालनगरीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. खाद्यसंस्कृतीच्या अविस्मरणीय अनुभवासाठी खवय्यांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष नितीन राणे, सचिव आशीष लोकरे व खजिनदार अनल पारकर यांनी केले आहे.

























































