
लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदासाठी आज नामांकन अर्ज दाखल केला. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात त्यांनी आपला अर्ज सादर केला. या पदासाठी दुसरा कुणीच दावेदार नसल्यामुळे लालू यादवच पक्षाचे सर्वेसर्वा असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पक्षाची स्थापना झाल्यापासून लालू प्रसाद यादवच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 12 कार्यकाळ पूर्ण केल्याची माहिती बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दिली. त्यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत राष्ट्रीय सहाय्यक निवडणूक अधिकारी चित्तरंजन गगन हे नामांकन अर्जांची तपासणी करतील.