लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात 9 जवान कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalu prasad yadav

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 9 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या जवानांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्याप्रकऱणी रांचीतील तुरुंगात शिक्षा भोगत होते. मात्र तिथे त्यांची प्रकृती ढासळल्याने यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मार्च महिन्यानंतर रिम्समध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर कोरोना वॉर्ड करण्यात आला होता. त्यामुळे लालू प्रसाद यादव व अन्य रुग्णांना तिसऱ्या माळ्यावर हलविण्यात आले होते. मात्र कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना 1 केली डायरेक्टर बंगल्यात हलविण्यात आले. एप्रिल महिन्यापासून ते या बंगल्यात राहत आहेत. अद्याप लालू प्रसाद .यादव यांची चाचणी करण्यात येणार की नाही हे समजलेले नाही.