गुहागर भातगाव रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पाऊसमुळे गुहागर भातगाव देऊळ वाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर आज पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. पुढील 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

landlide-at-guhagar1

आपली प्रतिक्रिया द्या