आयटीआर फायलिंगची डेडलाईन आली समीप

2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची डेडलाईन जवळ आली आहे. आयटीआर दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. आयटीआर दाखल करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीने आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. आयटीआर भरल्यानंतर अनेक फायदे मिळतात. तसेच आयटीआर भरल्याने कर्ज मिळवणे सोपे होते.