लता मंगेशकर यांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांनी न्युमोनिया आणि कोरोनावर मात केल्याची माहिती  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. तसेच अशक्तपणा असल्यामुळे त्यांना आणखी काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, ब्रीच कॅण्डी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांच्याशी बोलून मी लतादीदींच्या तब्येतीची माहिती घेतली आहे. त्यांना अशक्तपणा असून इन्फेक्शनचा थोडा त्रास होत आहे. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. लतादीदी डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. काही प्रमाणात अशक्तपणा असून आणखी काही दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू राहतील.

लतादीदी गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्या व्हेंटिलेटरवर नाहीत.  न्यूमोनिया आणि कोरोनातून त्या आता बऱया झाल्या आहेत.