‘सुरक्षित मुंबई’साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

286

मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून ‘सुरक्षित मुंबई’साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई पोलिसांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यात मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अधिकाऱयांना सूचना दिल्या. या बैठकीस गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कंट्रोल रूमची पाहणी
आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 24 तास कार्यरत असणाऱया नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱयांना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या