
लातूर जिल्ह्यात आज 15 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तपासणीसाठी आलेल्या 128 स्वॅब पैकी 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 9 जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये वाढत चाललेल्या कोरोना रुग्नामुळे चिंतेचे वातावरण तयार होत असून पुन्हा एकदा कडकडीत संचारबंदी लावावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते. त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 4 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहमदपूर येथिल 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
उदगीर येथे उपचार सुरू असताना कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.

























































