
लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तब्बल 324 रुग्ण संख्या वाढली आहे. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 7443 एवढी झाली, तर आजपर्यंत 5 हजार 564 रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत. आज सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापासून कोरोना चा कहर वाढत गेला आहे. ऑगस्ट महिन्यात तर कोरनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. आज प्रलंबितसह तब्बल 324 रुग्ण संख्या वाढली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 7443 एवढी झाली आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंत 5564 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आज तब्बल 173 रुग्ण बरे झाले आहेत.
मोठी बातमी – ‘अनलॉक 4’ची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय सुरू, काय बंद
जिल्ह्यात सध्या 1622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.





























































