तुटलेल्या विजेच्या तारेचा शाॅक लागल्याने चार जनावरांसह सालगड्याचा मृत्यू

998

तुटलेल्या विजेच्या तारेचा शाॅक लागुन चार जनावरांसह एका सालगड्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकूर तालुक्यातील शिवनी (मजरा) शेती शिवारात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली.

तालुक्यातील शिवनी मजरा येथिल मधुकर चामे यांच्या शेतात सोमवारी सायंकाळी अचानक उच्च दाबाचे विजेचे तार तुटले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विजेचे तार तुटल्याचे कळविले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. पण महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्यांने या लाईन वरिल वीज पुरवठा खंडित करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच एक गाय, तीन म्हशी अशे एकूण चार जनावरांसह सालगडी उत्तम विठ्ठलराव आलापूरे, शिवणी मजरा यांना आपला जिव गमवावा लागला आहे.

मयत आलापूरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी चाकूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जानवळ येथील प्राथमीक आरोग्य उपकेंद्रात पाठविले आसुन अमोल मधुकर चामे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या