लातूरमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी

लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बंद असलेले लसीकरण आज सुरू करण्यात आले आहे. मोजक्या केंद्रावर लसीकरण होत असल्याने आज पहाटे पासूनच लातूरकरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केलेली दिसून येत होती. गर्दीला आवरण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

लातूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण बंद करण्यात आले होते. लस उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. केवळ 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी शहरात दोन ठिकाणी प्रत्येकी 200 लस उपलब्ध होत्या. त्यासाठी अगोदर ऑनलाईन नोंदणी आवश्यक होती.

आज जिल्ह्यातील काही ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. पहाटे पासुनच दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. काही ठिकाणी तर गर्दी अधिक झाली म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या