लातूर जिल्ह्यात 313 पॉझिटीव्ह रुग्ण वाढले, 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तपासणीमध्ये पुन्हा ३१३ कोरोनाबाधित रुग्ण वाढलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२२६७ एवढी झालेली आहे. सध्या ३१०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३५५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

आज उपचाराने बरे झाल्यामुळे २६२ रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकूण ८८०५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या