
लातूर जल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर आणि परिसरामध्ये रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे. पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जळकोट तालुक्यातील काही भागात पाऊस झालेला होता.
रविवारी रेणापुर तालुक्यातील कारेपूर आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. साडे तीन वाजता पावसाला सुरुवात झाली होती तब्बल दीड तास पाऊस झाला. गारपीट ही झाली, यामुळे मिरची, आंबा, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
























































