किनीनवरे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

450
प्रातिनिधिक फोटो

औसा तालुक्यातील किनीनवरे येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. दुष्काळामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन जीवन संपवले. बब्रवान श्रीपती जाधव (52) असे त्याचे नाव आहे.

जाधव याने बँकेकडून कर्ज घेतले होते. पण दुष्काळामुळे पीक घेताच आले नाही. पण बँकेचा कर्जाचा डोंगर मात्र वाढत होता. यामुळे निराश झालेल्या जाधव यांनी 13 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले होते. त्यांना निलंगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतू त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे नावे 3 एकर शेती असून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खरोसा यांचे 45 हजार रुपये व खाजगी सावकाराचे 1 लाख रुपयाचे कर्ज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या