सार्वजनिक बोअरच्या कारणावरून राडा, दगड-विटांनी एकमेकांना मारहाण

878

सार्वजनिक बोअर चालू करण्याच्या कारणावरून लातूरमधील मौजे हनुमंतवाडी तांडा येथे दोन गटांत मारहाणीची घटना घडली. काठी , दगड , विटांचा वापर करून दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. झालेल्या मारहाण प्रकरणी दोन्ही गटातील सतरा जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रामराव ज्ञानोबा राठोड राहणार हनुमंतवाडी तांडा तालुका रेनापुर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की प्रवीण बालाजी राठोड आणि इतर सात जणांनी संगनमत करून फिर्यादीचा पुतण्या हा सार्वजनिक बोअर चालू करण्यासाठी गेला असता त्याला बोअर चालू करायचा नाही म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादी व त्याचा मुलगा यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली तसेच फिर्यादीचा पुतण्या अशोक आणि केशव यांना लाथाबुक्क्यांनी विटांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर प्रवीण बळीराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की रामराव ज्ञानोबा राठोड आणि इतर आठ जणांनी संगनमत करून फिर्यादी व त्याच्या भावास आम्हाला बोअर चे पाणी का देत नाही म्हणून शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. फिर्यादीची आई व इतर साक्षीदार भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी दगडाने मारहाण केली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध रेनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या