लातूरमध्ये डांगेवाडी तेरु नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा

485

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा शेजारी असलेली डांगेवाडीच्या तेरु  नदीत 50 ते 60 ट्रॅकरने अवैध वाळू उपसा सुरू आहे. असे असताना संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी या अवैध वाळू उपसा करणार्‍या माफियाकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा परिसरात चालू आहे. संबंधित अधिकारी व तलाठी जाणुन बुजून वाळू माफियाकडे डोळे झाक करत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

हा अवैध वाळू उपसा नदीतून अनेक महिन्यांपासुन चालू आहे कमीत कमी दिवसातुन 50 ते ट्रॅकटर वाळू  सर्रास वाळू माफिया घेऊन जात आहेत. दिवसा काठी 50 ट्रॅकटर ने वाळू नेऊन शासनाचा हजारो रुपये महसुल बुडवीत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाढवणा सज्जाचे तलाठी यांच्या कडुन माहिती घेतली असता ही नदी जळकोट मध्ये आहे की वाढवणा सज्जात येते हीच माहिती नसल्याचे अजब उत्तर अधिकार्‍यांनी दिले. तसेच यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे अधिकार्‍यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या