
औसा तालुक्यातील मौजे सिंदाळा (लो.) येथे एका 85 वर्षाच्या वृध्द शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आणि मुलाला महाजनकोच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी रमाकांत रावसाहेब घोडके यांनी भादा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचे वडील रावसाहेब शिवराम घोडके (85) यांनी बाळासाहेब घोडके यांच्यासोबत असलेल्या जुन्या जमिनीच्या वादाच्या त्रासाला कंटाळून तसेच महाजनकोचे संबंधित अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे मुलास नोकरी लागली नाही 9 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. भादा पोलीस ठाण्यात या प्रकरणी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































