
मौजे डोंगर शेळकी येथे घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीस तेल आणून देण्यासाठी बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शंभू गोपाळसिंग ठाकूर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, मौजे डोंगर शेळकी येथे अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी ठाकूर याने तिला तेल आणून दे म्हणून बोलावले. नंतर तिला जवळ बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे केले. मुलीची आई शेतातून घरी परत आल्यानंतर मुलीने ही घटना आईला सांगितली. बाहेरगावी गेलेले पिडीत मुलीचे वडील आणि आजोबा आल्यानंतर त्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर शंभू ठाकूर त्याची आई, वडील यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी शंभू गोपाळसिंग ठाकूर याच्याविरुध्दगुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

































































