तरुणाला मारहाण करत टोळक्याने पळवला मोबाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

येथील रेल्वे स्टेशनवरील बसमध्ये अज्ञात टोळक्याने जागेच्या कारणावरुन मारहाण करत तरुणाला मारहाण केली व मोबाईल आणि 30 हजार रुपये लंपास केले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धनशाम नारायण कांबळे रा. मोतीनगर यांनी तक्रार दाखल केली. 23 रोजी सायंकाळी 6.30 फिर्यादी हे रेल्वेगेटवर थांबलेल्या एमएच 14 बीटी 2528 या बसमध्ये बसत होते. सीटवर बसण्याच्या कारणावरुन 10 मुलांनी त्यांना लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. त्यांच्याजवळील व्हिओ कंपनीचा 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख 30 हजार रुपये पळवले. या प्रकरणी रविवार 24 रोजी रात्री 12.20 वाजता पोलीसांनी अज्ञात 10 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळ हे करीत आहेत.