
सामना प्रतिनिधी । लातूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार कल्याण समिती यांच्यातर्फे आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरात 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्द्याटन करण्यात येणार आहे. 19 डिसेंबर रोजी ठाणे येथील भैरवी, 20 डिसेंबर रोजी नांदेड येथील तव मृत्यूवे नमः, 21 डिसेंबर रोजी सोलापूरचे पुरुषार्थ, 22 डिसेंबर रोजी यवतमाळ येथील अनफेअर डील, 23 डिसेंबर रोजी रायगड येथील आकांत हे नाटक सादर करण्यात येणार आहे.































































