
लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा 325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 12 हजाराच्या जवळ पोहोचली आहे. उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 350 वर पोहचली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे मिटर बेफाम पळत आहे. जिल्ह्यात पुन्हा 325 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. कोरुना बाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 954 वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केली असून लातूर जिल्ह्यात आज पर्यंत तब्बल 350 जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात आज 273 कोरोना बाधित रुग्ण उपचाराने बरे झाले तर आजपर्यंत 8543 रुग्ण बरे झाले असून जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा 71 46 % टक्के आहे.



























































