
निलंगा तालुक्यातील मौजे रामलिंग मुदगड येथे (१८ फेब्रुवारी) सकाळी गावातुन स्वतः च्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून घात की अपघात याची चर्चा होत आहे. प्रथमदर्शनी घातपात झाला असल्याचे आढळून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामलिंग मुदगड ता. निलंगा येथील रहिवाशी तरुण गुलाब विलास खरोसे वय वर्षे ३२ हा शेती व वाहन चालकाचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
यादरम्यान (१७ फेब्रुवारी) रात्री नऊ वाजताच्या सुमारास नेहमी प्रमाणे डबा व दुधाचे कॅन घेऊन तो आपल्या दुचाकीवरून शेताकडे गेला होता पण सकाळी सात वाजता शेताकडील शेजाऱ्यांनी तरुणाचे वडील विलास यांना फोन करुन सांगितले की तुमचा मुलगा एका खड्ड्यात पडला असुन त्यावर गाडी पडलेली आहे. तो मेलेल्या अवस्थेत दिसत असल्याची माहिती दिली. यामुळे घराकडील मंडळीनी धाव घेत परीस्थिती पाहुन काही तरी घडले आहे म्हणून पोलीसांना कळवले पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
























































