जेष्ठ विचारवंत आणि माजी खासदार डॉ.जनार्धन वाघमारे यांचे निधन, कवठा येथे होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे आजीव सदस्य तथा लातूर जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी वयाच्या 92व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. कवठा या गावी त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ.जनार्दन वाघमारे यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात भरघोस योगदान दिले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठाचे पहिले कुलगुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुचेता, जावई राजेंद्र शास्त्री, मुलगा जितेंद्र, सून शोभा, मुलगी अस्मिता व जावई आयेंद्र असा परिवार आहे.