पेट्रोलपंप मिळवून देण्याचे अमिष दाखवून उदगीर येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाची 1 लाख 91 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रविंद्र नाराणराव नळगीरकर (वय 59 वर्षे) सेवानिवृत्त रा.नळगीर यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या मुलास ईमेल करून तसेच मोबाईलवर इंडियन ऑईल कार्पोरेशन लि.क. कर्मचारी असल्याचे सांगितले. कंपनीचा लोगो वापरून पेट्रोलपंप मिळवून देण्याचे अमिष दाखवले. फिर्यादीच्या अकाऊंटचे नेट बँकींग वरुन परस्पर 1 लाख 91 हजार रुपये उचलून घेतले आणि आर्थिक फसवणूक केली. उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.



























































