
सामना प्रतिनिधी। लातूर
अहमदपूर तालूक्यातील मौजे तेलगाव येथे चोरट्यांनी घर फोडले. सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी धनंजय दिनकर जाधव याने तक्रार दाखल केली. फिर्यादी आणि त्याची आई हे रात्री झोपण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील भिंतीवरुन घरात प्रवेश केला. घरातील खोलीमधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडले, कपाटातील लोखंडी पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख 85000 रुपये असा सुमारे 1 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले हे करीत आहेत.


































































