
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालूक्यात कासारशिरसी येथील कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि विविध कंपनीच्या साड्या असा सुमारे 3 लाख 55 हजार 275 रुपयांचे मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.
कासारशिरसी पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी संतोष संभाजी धुमाळ (रा. मिरगाळी, ता. निलंगा) यांनी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी संजय कलेक्शन या कापड दुकानाच्या शटरच्या कुलपाजवळील लोखंडी पत्रा तोडून दुकानात प्रवेश केला. रोख 5 हजार रुपये आणि दुकानातील विविध कंपनीच्या साड्या असा सुमारे 3 लाख 55 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक गर्जे करीत आहेत.





























































