
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसोबत 12 राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असे विधी आयोगाने म्हटले आहे. यामुळे देशात या वेळी एक देश एक निवडणूक हे सूत्र लागू होत नाही, पण देशात निम्म्या राज्यांत विधानसभांबरोबरच लोकसभेची निवडणूक होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह 12 राज्यांत लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेच्या निवडणुका होतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
विधी आयोगाने एक देश एक निवडणुकीबाबतचा मसुदा अहवाल केंद्राला सादर केला आहे. यात वरील मतप्रदर्शनाबरोबरच देशात लोकसभेबरोबरच सर्व राज्यांत विधानसभेच्या निवडणुका घ्या. त्यासाठी घटनेत दुरुस्ती करा, अशी शिफारस केंद्र सरकारला केली आहे.
























































