
कोरोनाचा फटका राज्यातील हजारो लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 संपायला दोन महिने शिल्लक असताना अद्याप परीक्षांचाच पत्ता नाही. त्यामुळे तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
जून 2020 पासून लॉ अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. एप्रिल 2021 मध्ये हे वर्ष संपणार आहे. लॉ सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची आतापर्यंत प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप प्रवेशच सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे लेक्चर्सही झालेले नाहीत. लॉ स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन पवार यांनी सांगितले, ‘‘लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्याप पहिल्याच टप्प्यात आहे. यानंतर प्रवेशाचे आणखी दोन टप्पे पार पडणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया संपल्यावर कॉलेज सुरू होऊन परीक्षा पार पडण्यास पुढील शैक्षणिक वर्ष उजाडण्याचीच चिन्हे आहेत.’’
– लॉ सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची आतापर्यंत प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




























































