
जनादेश हा सर्वोच्च असतो. बंगालच्या जनतेने जर भाजपला पसंती दिली असेल, तर आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो, असे विधान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केले आहे. तसेच संविधान हेच अंतिम असेल अशा धर्मनिरपेक्ष देशासाठी लढत राहू असेही मोईत्रा म्हणाल्या.
एक्सवर पोस्ट करून महुआ मोईत्रा म्हणाल्या की, जनादेश हा सर्वोच्च असतो. बंगालच्या जनतेने जर भाजपला पसंती दिली असेल, तर आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. अत्यंत प्रतिकूल आणि असमान परिस्थितीत, जिथे खेळाचे मैदानच समसमान नव्हते, तरीही आम्ही पूर्ण ताकदीने लढा दिला. या लढ्याचा, माझ्या नेत्यांचा आणि पक्षाचा मला अभिमान आहे, असे मोईत्रा म्हणाल्या.
तसेच जिथे बहुसंख्यांच्या जोरजबरदस्तीचा नव्हे पण संविधानाचाच शब्द अंतिम असेल अशा धर्मनिरपेक्ष हिंदुस्थानासाठी आम्ही ठामपणे उभे राहू आणि लढत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
The will of the people is supreme. If Bengal wanted BJP then Bengal has got BJP. We respect that. We fought the good fight against unimaginable odds on an uneven pitch and for that I am proud of my leader & my party. We will continue to stand & fight for a secular country where…
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 5, 2026





























































