हे राम! अयोध्या विमानतळाला गळती

उत्तर प्रदेशातील अयोध्येत दोन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या महर्षी वाल्मीकी एअरपोर्टच्या छताला गळती लागलेय. एअरपोर्टच्या बाहेरील स्टँडिंग एरियात छतातून पाणी पडतेय याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामुळे एअरपोर्टच्या बांधकामाची गुणवत्ता आणि मेंटेनन्सवर सवाल उपस्थित होतोय. करोडो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या विमानतळाला गळती कशी काय लागली, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. पाऊस गेला की रिपेरिंगचे काम सुरू होईल, असे एअरपोर्ट प्राधिकरणाचे संचालक विनोद कुमार यांनी सांगितले. मेंटेनन्सची टेंडर प्रक्रिया पाईपलाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाऊस जाईपर्यंत प्रवाशांनी अडचणींचा सामना करायचा का, असा सवाल उपस्थित होतोय.