
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा रुक्ष होते. अनेकदा तर ती काळवंडते, त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना, कोणतेही रासायनिक उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय करणे हे सर्वात उत्तम. घरगुती उपायांमुळे त्वचेला हानी पोहोचत नाही. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या फळांचा वापर करणे हे सर्वात उत्तम मानले जाते.
हिवाळ्यात पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा
डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा रस त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. डाळिंब पोषक तत्वांनी समृद्ध असून, त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. डाळिंबामुळे आपल्या रक्ताचा प्रवाह वाढतो आणि हृदयात ऑक्सिजनची पातळी वाढते. हे आपले सौंदर्य वाढविण्यास मदत करते.
हिवाळ्यात डाळिंबाचा वापर केल्याने त्वचा कोमल होण्यास मदत होते. कोमल त्वचेसाठी आपण डाळिंबाचा फेस पॅक वापरु शकतो. याकरता डाळिंबाचे दाणे घ्यावे त्याची पेस्ट बनवा. फेसपॅक करण्यासाठी थोडे दूध आणि मध मिसळा. हे मिश्रण एकजीव करा आणि आपला चेहरा आणि मानेवर लावा. ते 10-15 मिनिटे तसेच ठेवावे आणि कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून किमान एकदा हे करायलाच हवे.
लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायलाच हवे, वाचा
डाळिंब त्वचेतून मृत पेशी दूर करतो. तसेच डाळिंब लोहाचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. डाळिंबाचा उपयोग आपल्या सौंदर्याच्या सोबतीने आपल्या आहारातही करणे खूपच गरजेचे आहे.
सर्वांना सुंदर ओठ हवे असतात. तुम्हाला ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवायचे असतील तर नियमितपणे डाळिंबाच्या रसाचे सेवन करा. हे अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी इत्यादी समृद्ध आहे जे निरोगी ओठांसाठी खूप महत्वाचे आहे.
डाळिंब तुमच्या रक्तवाहिन्या तसेच तुमच्या त्वचेच्या पेशींसाठी मोठ्या प्रमाणात खनिज पुरवतो. त्याचे पोषक घटक आपल्या हिमोग्लोबिन वाढवते. त्यामुळे त्वचेला चमक येते. डाळिंब देखील पाण्याचा चांगला स्रोत आहे. हे त्वचेला हायड्रेटेड आणि चमक ठेवण्यास मदत करते.

























































