देशातील अडीच लाख किलोमीटरच्या रस्त्यांना एलईडीची चकाकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील तब्बल दोन लाख 70 हजार किलोमीटरच्या रस्त्यांना आता एलईडी दिव्यांची चकाकी मिळाली आहे. विजेची बचत करून ती घराघरांत पोहचवण्याची मोहीम केंद्रीय ऊर्जा विभागाने एनर्जी ईफिसियन्सी लिमिटेड (ईईएसएल) च्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत एक कोटी एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते लख्ख प्रकाशाने उजळून निघाले आहेत.

ऊर्जा बचतीसाठी घराघरांत एलईडी दिव्यांचा वापर करावा म्हणून ईईएसएलने देशातील वीज वितरण कंपन्यांच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक एलईडी बल्बची कमी दरात विक्री केली होती. त्याला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद आणि वीज बचतीचे प्रमाण पाहता ऊर्जा विभागाने पथदिवे आणि शासकीय कार्यालयांमध्येही एलईडी दिवे बसवण्याबाबतचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरयाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश अशा विविध 31 राज्यांमधील तब्बल 2 लाख 7 लाख लांबीच्या रस्त्यांवर असलेले जुने पथदिवे काढून एक कोटी पथदिवे बसवण्याचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण केले आहे.