बीड शहर एलईडी ने उजळणार..!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड 

केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत असलेल्या एनर्जी ईफिसीयन्सी सर्व्हीसेस लिमिटेड च्या माध्यमातून एसको तत्वावर एलईडी दिवे बसविण्याच्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते चांदणी चौक या ठिकाणी आज करण्यात आले. यावेळी मुख्यअधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, सभापती मुखीद लाला, विकास जोगदंड, सादेक भाई, नगरसेवक जलील खान पठाण, सादेक, व न.प.चे अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शहरात हे ११००० नवीन एलईडीसह जवळपास १५०० पोल बसवण्यात येणार आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातुन सुरु झालेल्या या कामामुळे शहरवासियामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या योजनेमुळे न.प.ची साडेतीन कोटी रुपये विजबीलात बचत होणार आहे. केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच ही योजना बीड शहराला मिळाली आहे.