
शिवसेनाप्रणीत शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी महिलांसाठी ‘हक्काची ज्योत – कायद्याच्या प्रकाशात – प्रथम ती’ या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम शिवसेना भवन, दुसरा मजला येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होईल. या कार्यक्रमाला माजी महापौर विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी महापौर सुरेखा कदम, महिला संघटिका रंजना नेवाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या मुख्य निमंत्रिका संघटनेच्या उपाध्यक्षा अॅड. सुरेखा गायकवाड आहेत.