रत्नागिरीत बिबट्याचा प्राणघातक हल्ला, सरपंचासह 6 जखमी

1494
leopard

पावस परिसरात बिबट्याने पुन्हा सहा जणांवर प्राणघातक हल्ला केला. शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. चार मोटरसायकलवरून सहा जण आपल्या घरी निघाले असताना बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये बळीराम जोशीलकर वय २२, निखील साळवी वय २२, निलेश म्हादये,संदीप शिंदे वय ३६, मंजनाथ आदीन वय ४२ नीलेश नाटेकर ४३ हे गंभीर जखमी झाले.

बिबट्याने टप्या टप्याने हल्ला केला. पहिला हल्ला गणेशगुळेचे सरपंच संदीप शेट्य यांच्यावर झाला, यात तेे जखमी झाले. ते रस्त्यावर पडलेले असतानाच पाठोपाठ आलेल्या चार जणांवर बिबट्याने हल्ला केला. जखमी मंजनाथला रूग्णालयात घेऊन जात असताना बिबट्याने नीलेश नाटेकर यांच्यावर हल्ला केला. जखमी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

leopad-attack23

शिवसेनेचे विभागप्रमुख रविकीरण तोडणकर यांनी वनविभाग बिबट्याला पकडू शकत नसल्याने या घटना वारंवार होत आहेत. वनविभागाला आता तरी जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारले.

आपली प्रतिक्रिया द्या