श्रीरामपूरात बिबट्याचा गाय- वासरावर  हल्ला, फटाक्याच्या आवाजाने बिबट्याने ठोकली धुम

510
leopard

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एका बिबट्याने गाय आणि वासरावर हल्ला केला. पण फटाक्याच्या आवाजाने त्याने धूम ठोकली. यात वासरू जखमी झाले आहेत.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या  गोंधवणी परिसरात बुधवारी  रात्री 10 च्या सुमारास  स्व.बापूसाहेब गाडे यांच्या वस्तीवर बिबट्याने गाय व दोन दिवसाच्या कालवडीवर हल्ला केला. रात्री गाडे वस्ती वर  बिबटा आला होता. वासराला बिबट्याने तोंडात धरले. धनंजय मधूकर गाडे यांनी  बिबट्यास  पाहिले.   गाडे यांनी  लगेच फटाके फोडले. फटाक्याचा आवाज होताच  बिबट्याने  ऊसाच्या शेतात धुम ठोकली.   वासराला  दात लागल्याच्या खुणा आहेत.

दोन दिवसापूवीं याच भागातील  फरगडे वस्तीवर बिबट्याने लोकांना दर्शन  दिले होते.  दरम्यान प्रणय गाडे यांनी  वनविभाग आधिकारी  रमेश देवखिळे नगर येथील वन अधिकार्‍यांना  माहिती दिली.  बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2005 साली याच वस्तीवर एका बिबट्याला जेरबंद केले होते. बिबट्याच्या धुमाकुळीमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच बुधवारी रात्री टाकळीभान घोगगरगाव रस्यावरील कोबरणे वस्तीवरुन बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. देवळाली प़वरा परीसरात बिबट्यांनी दोन शेळ्यांना जखमी केले. वनविभागाने संबंधीत ठिकानी पिंजरे लावावेत अशी मागणी होत आहे. मागील आठवड्यात उक्कलगाव परिसरात एक बिबटा पिंजर्‍यात जेरबंद केला.  तरी दहशत कायम आहे. श्रीरामपूर तालुक्यात किती बिबटे आहेत, हे  समजू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या