तेरी मेहरबानियाँ! मालकाला वाचवण्यासाठी कुत्रा बिबट्याशी लढला; शेतकरी वाचला, पण…

प्रातिनिथिक फोटो

वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातील रोहना शेत शिवारात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यांच्या सोबतीला असणारा एक कुत्रा मालकाला वाचवताना ठार झाला आहे. सुखदेव शिंदे (वय 55 ) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रोहना इथं सायंकाळी ही घटना घडली.

सुखदेव शिंदे हे आपल्या शेतात गव्हाच्या पिकाची राखण करण्याकरता गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सुखदेव शिंदे हे गंभीर जखमी झाले. मालकावर हल्ला झाल्यानंतर बिबट्यावर धावून गेलेल्या कुत्र्याला बिबट्याने ठार केले.

कुत्रा बिबट्यावर धावल्याने बिबट्याने शिंदे यांना सोडून कुत्र्यावर हल्ला चढवला. कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव गमावला.

दरम्यान, गंभीर जखमी सुखदेव शिंदे यांच्यावर उपचार सुरू असून रोहणा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यांचा प्रशासनाने ताबोडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या