रोहिलेवाडीत बिबट्याचा दिवसाच शेळीवर हल्ला

367

शिरूरच्या पश्चिम भागातील बागायती पट्ट्यात बिबट्यांची दहशत कायम असून गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास येथील फॉरेस्ट नजीकच्या शेतात शेळ्या चरत असताना अचानक बिबट्याने एका शेळीवर हल्ला करीत तिच्या मानेला पकडले. शेतकरी मारुती दगडू पवार यांनी आरडा-ओरड केल्याने व सतर्कता दाखविल्याने बिबट्या शेळीला सोडून बाजूच्या उसाच्या शेतात गायब झाल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळीवर पशुवैद्यक प्रवीण भालेराव यांनी तातडीने उपचार केले.कवठे येमाई व परिसरात बिबटयांची मोठीच दहशत असून शेतकरी व महिला दिवसाही शेतात काम करण्यासाठी घाबरत असल्याचे ग्रा.पं. सदस्य सुरेश रोहिले यांनी सांगितले. सध्या या भागात उसाची तोड सुरू असून मादी बिबट्यांसह पिल्लांचे रोहिलवाडी, मुंजाळवाडी, येडेबोऱ्हाडे वस्ती परिसरात वास्तव्य असून नागरिक शेतात रात्रीचे काम करणे सोडाच पण बिबट्यांच्या दहशतीने दिवसाही घाबरू लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या