
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या मोरगेवस्तीत सकाळी 10 वाजल्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वन विभागाने तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद केले. बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचारी लक्ष्मण किमकर (50), वृषभ अंबादास निकाळजे (8), श्रद्धा हिंगे (11), कांतासेठ कुमावत (35), बाळासाहेब आडांगळे (55), राहुल मारुती छल्लारे (42), मारुती शिंदे (50) जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





























































