पाहा व्हिडीओ : बिबट्या माय-लेकांची अनोखी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जुन्नर

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याच्या तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या बातम्या आपण पाहात असतो. मात्र आई पासून वेगळ्या झालेल्या बिबट्याच्या बछड्यासा पुन्हा आईच्या मायेची उब मिळवून दिल्याची अनोकी घटना जुन्नरमध्ये पाहायला मिळाली. जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैधकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी आपल्या पथकासह ही यशस्वी कामगीरी केली आहे. या माय-लेकाची ही भेट नाईट व्हिजन कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हान गावातील एका उसाच्या शेतात 2 दिवसांपासून एक 3 महिन्याचा बिबट्याचा बछडा असल्याची महिती शेतकऱ्याने वनविभागाला दिली होती. त्यानुसार जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैधकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख आपल्या पथकासह शेतात पोहोचले आणि या बछड्याला औषधोपचार करून रात्री याच शेतात टोमॅटोसाठी वापरला जाणाऱ्या कॅरेट खाली लपवून ठेवले. जेणेकरून मादी येऊन आपल्या पिल्लाला घेऊन जाईल. अखेर मध्यरात्री या बछड्याची आई आली आणि आपल्या पिल्लाला घेऊन गेली. हा संपूर्ण घटनाक्रम तेथे लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. यानंतर माय लेकाची भेट घडवून आणणारे अधिकारी डॉ. अजय देशमुख आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.