चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूला मृतावस्थेत आढळला बिबट्या

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गाच्या बाजूला पूर्ण वाढ झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. भरधाव कारने रविवारी झाडाला धडक दिली होती, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. रविवारी रात्री वेगवान कार झाडाला धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले होते. या कारमध्ये बल्लारपूर शहरातील काही व्यक्ती होते आणि त्यातील 2 गंभीर जखमी झाले होते.

आगरझरी येथील टायगर सफारी झाल्यावर हे पर्यटक अतिशय वेगाने जात असताना हा अपघात झाला होता. वनविभाग आणि दुर्गापुर पोलिसांनी या अपघाताची सखोल चौकशी केली नसल्याचे दिसून आले आहे. 3 दिवसांनी या भागात दुर्गंधी पसरल्यावर बिबट्या मेल्याचे आढळले. वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मोहूर्ली मार्गावर मद्यधुंद पर्यटक वाहनांचा वेग वनविभागासाठी चिंतेची बाब बनली आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या