
रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच घरात घुसून गोठ्यातील गायीवर हल्ला करत बिबट्याने तिला ठार मारले. दररोज लोकांच्या पाळीव कुत्र्यांवरही बिबट्या हल्ले करत आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्याची दहशत असून वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
रिळ गावामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये येथील गायीगुरे आणि कुत्र्यांचा जीव जात आहे. घरामध्ये पाळलेल्या डॉबरमन कुत्र्यांवरही बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गावामध्ये घडली आहे. घरातील गोठ्यात शिरुन बिबट्याने गायीवर जीवघेणा हल्ला करत तिला ठार मारले. बिबट्यामुळे येथील स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाळीव जनावरांवर दररोज हल्ले होत आहेत.
मनुष्यवस्तीमध्ये होत असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, या कॅमेर्यातून वनविभागाला बिबट्या दिसत नाही. बिबट्या हे कॅमेरे चुकवून दररोज पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे. आता वनविभाग पिंजरा लावण्यासाठी माणसाच्या बळीची वाट पहात आहे का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी सांगितले की रिळ गावामध्ये वनविभागाच्या पथकाने पाहणी केली. त्याठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.
































































