
सामना प्रतिनिधी । भोकर
भोकर तालुक्यातील मौजे कोळगाव(खू) येथील साईनाथ गंगाधर गादेपवाड यांच्या शेतातील गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास घडली.
मौजे कोळगाव खु. येथील शेतकरी साईनाथ गंगाधर गादेपवाड यांच्या शेतामध्ये गाभण असलेली गाय बांधलेली होती. रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यापूर्वीही या परिसरात एका जनावराला बिबट्याने फस्त केले होते. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनपाल अंगद खटाने, वनरक्षक जि. आर. बच्चेवाड यांनी जाऊन पंचनामा केला.

































































