उच्च शिक्षित तरुण करत होते बिबट्याच्या कातडीची तस्करी

176

भंडाऱयात उच्चशिक्षित सहा युवक बिबटय़ाच्या कातडीची विक्री करण्याचा प्रयत्न करत होते. या सहा जणांना भंडाऱयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बिबटय़ाची कातडी व जबडा वन विभागच्या ताब्यात दिला आहे.

दुर्योधन गहाणे (32), पंकज दिघोरे (25), लक्ष्मीकांत नान्हे (29), योगेश्वर गहाणे (41), रंजीत रामटेके (26), चंद्रशेखर रामटेके (40) यांना अटक करण्यात आले आहे. साकोली शहरात काही जण बिबटय़ाची कातडी विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी साकोली येथे सापळा रचून त्या सहा जणांना बोदरा ते पिंडकेपार रस्त्यावर बोलवून पोलिसांनी त्यांना अटक केली. यामध्ये त्यांच्याकडून कातडीसह एकूण 26 लाख 11 हजार 400 रुपयांचे साहित्य हस्तगत केले आले.
सवा लाखांचा जबडाही सापडला

रंजित व चंद्रशेखर रामटेके यांच्याकडे बिबटय़ाचा जबडा असल्याचे त्यांच्या सहकाऱयांनी सांगितले. त्यानुसार त्यांना अटक करून त्यांच्याकडून सवा लाख रुपये किमतीचा जबडाही ताब्यात घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या