
इंग्लंडचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने रविवारी तुर्की ग्रांप्री स्पर्धा जिंकून जर्मनीच्या मायकल शूमाकरला गाठण्याचा पराक्रम केला. त्याने आजच्या विजेतेपदासह शूमाकरच्या 7 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या विक्रमाची बरोबरी केली.
मर्सिडीजचा 35 वर्षीय ड्रायव्हर असलेल्या हॅमिल्टनने शनिवारीच सर्वाधिक शर्यती जिंकण्याच्या विक्रमाला गवसणी घालताना शूमाकरलाच मागे टाकले होते. शूमाकरने 2006 मध्ये चायना ग्रांप्री जिंकून सर्वाधिक 261 शर्यती जिंकण्याचा विक्रम केला होता. हॅमिल्टनने शनिवारी 262 वी शर्यत जिंकून शूमाकरचा विक्रम मोडीत काढला होता.





























































