लीड बॅटरी उत्पादकांना प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लीड ऑसिड बॅटरी सर्वाधिक वापरणारे ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे भंगार सामान संकलित करणारे आणि लीडचे रिसायकलिंग करणारे एक असंघटित क्षेत्रही अस्तित्वात आहे. अशा बेकायदेशीर आणि घातक कार्यपद्धतींमुळे पर्यावरणाला धोका पोहोचतोच, त्याचप्रमाणे अशा मटेरिअलच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांसाठी हे अपायकारक असते. यापार्श्वभूमीवर इंडिया लीड झिंक डेव्हलपमेंट असोसिएशनने लीड बॅटरी उत्पादक आणि रिसायकल करणाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, जेणेकरून वापरलेल्या लीड बॅटरींचे पर्यावरणस्नेही रिसायकलिंग करण्याची खातरजमा केली जाईल.