
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेले दांपत्य आणि त्यांना वाचावयला गेलेला एक जण समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी तिघांना वाचवले आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता घडली. इस्लामपूर येथून विनायक जौंजाळ (36) आणि निलम जौंजाळ (26) हे दांपत्य आज गणपतीपुळे येथे आले होते.
दोघेही समुद्रात पोहण्यासाठी गेलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गंटागळ्या खाऊ लागले. ते बुडत असताना किनाऱ्यावरील सुरेश तायडे (रा.संभाजीनगर) याने पाण्यात उडी मारून वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र तोही गंटागळ्या खाऊ लागला. इतक्यात किनारपट्टीवरील जीवनक्षक अनिकेत राजवाडकर, आशिष माने, मयुरेश देवरुखकर,अभय मोरे आणि मोरसा वॉटर स्पोर्ट्स बीच असोसिएशनने समुद्रात झेपावत बुडणाऱ्या तिघांचे प्राण वाचवले.



























































