वीज कोसळून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी बीड जिल्ह्यात वादळी वारा आणि जोराचा पाऊस सुरू होता. या कालावधीत वीज कोसळून वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

वडवणी तालुक्यातील मोरवड येथील विष्णू अशोक अंडील (17) पुजा अशोक अंडील (15) हे आपल्या शेतामध्ये गेले असताना जोराचा पाऊस सुरू झाला. त्यावेळी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला आणि वीज कोसळून या दोन्ही बहिण-भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने मोरवड गावामध्ये शोककळा पसरली आहे.