
सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी तिसरा समन्स बजावलेला आहे. त्या समन्समध्ये केजरीवाल यांना 3 जानेवारीला म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते लागोपाठ तिसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयापुढे अनुपस्थित राहिले आहेत.. त्यांनी ही नोटीस बेकायशीर असूून निवडणुकीआधीच का समन्स आले असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी तीन समन्स पाठववून 3 जानेवारीला म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर ‘आप’च्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत सीएम केजरीवाल यांना तिसऱ्या समन्सवर ईडीसमोर उपस्थित राहण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ते कायद्यानुसार काम करतील. ‘आप’ने पहिले दोन समन्स बेकायदेशीर ठरवले आणि मुख्यमंत्री चौकशीला गेले नाहीत, काही चुकत नसेल तर का नाही गेलात? यावर प्रियंका म्हणाल्या की, आमचे वकील यासंदर्भात योग्य माहिती देऊ शकतील.
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात समन्स पाठवले होते. त्यानंतर त्यांना 2 नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. पण यादरम्यानही ते गैरहजर राहीले. त्यावेळी त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगून नोटीस मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ते गैरहजर राहत 10 दिवसांच्या विपश्यना कार्यक्रमात गेल्याचे सांगितले. आता ईडीने अरविंद केजरीवाल यांनी तिसरा समन्स दिला असून आज 3 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ही नोटीस बेकायशीर असूून निवडणुकीआधीच का समन्स आले असा प्रश्न उपस्थित केला आहे.
























































